जमीन आपल्यावर आवळले जात आहे, ते आपल्याला एका अरुंद शेवटच्या गल्लीतून पुढे ढकलत आहे,
आणि तिथून पार होण्यासाठी आपण आपलेच अवयव तोडून फेकत आहोत.
ही भूमी आपल्याला चिरडत आहे... Kadachit! आपण तिचे गव्हाचे पीक असतो,
जेणेकरून आपण मरून पुन्हा जिवंत झालो असतो.
कदाचित! ही भूमी आपली आई असती,
जेणेकरून तिने आपल्यावर दया दाखवली असती...
शेवटच्या सीमांनंतर आपण कुठे जायचे?
शेवटच्या आकाशाच्या पलीकडे पक्षांनी कुठे उडायचे?
शेवटच्या श्वासानंतर वनस्पतींनी कुठे विश्रांती घ्यायची?
आपण आपली नावे लाल धुक्याने (रक्ताने) लिहू.
गाण्याचे हात कलम करून आपण आपल्या मांसाने ते पूर्ण करू.
इथेच आपण मरू. इथे, या शेवटच्या वाटेवर.
इथे, किंवा तिथे... आपले रक्त आपले ऑलिव्हचे झाड रोवेल.
Comments
Post a Comment